POLITICAL : शिंदे गटाचे आ.बालाजी कल्याणकर विवाह सोहळ्यासाठी गेले असताना त्यांच्या वाहनाची तोडफोड झाली. मराठा आरक्षणावरुन आंदोलकाकडून दगडफेक झाल्याचा संशय व्यक्त केले जात आहे. सविस्तर माहिती अशी की, महाराष्ट्र सरकार मधील शिंदे गटाचे आ. बालाजी कल्याणकरांच्या वाहनाची तोडफोड झाली आहे. आ. बालाजी कल्याणकर आपल्या वाहनातून विवाह सोहळ्यासाठी गेले असताना तेथे अज्ञातांनी वाहनावर दगडफेक केल्याने वाहनाच्या काचा फोडण्यात आले आहेत.
रविवारी दुपारच्या सुमारास अर्धापूर या तालुक्यातील देगाव कुराडा या गावात ही घटना घडलेली आहे. जरांगे पाटलांनी मराठा आरक्षण व सगेसोयरे ची अंमल बजावणी होत नसल्यामुळे मराठा आरक्षणातील आंदोलकानी या आमदारांच्या वाहनावर दगडफेक केलेली असावी असा संशय व्यक्त करण्यात येत आहे. या घडलेल्या घटनेने अर्धापूर तालुक्यामध्ये खळबळ उडालेली आहेत.
हाती लागलेल्या माहितीनुसार, अर्धापूर या तालुक्यामधील देगांव कुराडा याठिकाणी रविवारी विवाह सोहळा होते. या सोहळ्याला नांदेडचे आमदार बालाजी कल्याणकर यांची उपस्थिती होती. या सोहळ्यासाठी मंडपच्या द्वाराजवळ आमदारांची वाहन उभी करून आ.कल्याणकर हे सोहळ्यातील वधू वर यांना भेट घेण्यासाठी गेले असताना. यावेळी काही अज्ञाताकडून वाहनावर दगडफेक करण्यात आले त्यामुळे वाहनाच्या काचा फोडल्या गेल्या. गाडीजवळ कोणी नसल्याने यात कोणाला इजा झाल्या नाही केवळ वाहनाचे काही प्रमाणात नुकसान झाले आहे. या घटनेमुळे नंतर गावामध्ये मोठ्या प्रमाणात खळबळ उडाली. या घटनेमुळे गावात काही काळ तणाव निर्माण झाला.
दरम्यान, या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच घटनाच्या ठिकाणी धाव घेतली. जरांगे पाटलांच्या मराठा आरक्षणावरून आ. बालाजी कल्याणकरांच्या वाहनावर दगदफेक करण्यात आल्याची शंका व्यक्त केली जात आहेत. महत्वाचे म्हणजे काही दिवसा अगोदर काँग्रेसचे आ. मोहन हंबर्डे यांच्या वाहन ही फोडण्यात आल्याची घटना घडली होती. खा. प्रताप पाटील चिखलीकरांच्या वाहनावरही दगडफेक करुन वाहनाचे नुकसान करण्यात आली होती. पाटलांच्या मराठा आरक्षण व सगेसोयरे यांची अंमलबजावणी होत नसल्यामुळे आंदोलक हे लोक प्रतिनिधीवर नाराज असल्यामुळे अशा घटना घडत असल्याचे दिसून येत आहेत.
दरम्यान, मराठा आरक्षणामुळे गावाबंदीचे बॅनर नंतर आता मराठा बांधवाकडून घराच्या दारा वरती आता पोस्टर लावले जात आहेत. या अगोदर ओबीसीमधुन मराठा आरक्षणानंतर इलेक्शन या आशया चे पोस्टर व बॅनर घरा च्या दारांवरती लावले जात आहेत.