पंजाब व सिंध बँकेमध्ये (panjab and sindh bank) अप्रेंटिस या पदासाठी भरती प्रक्रिया सुरुवात झाली आहे. ही भरती प्रक्रिया बँकिंग क्षेत्रात करियर करण्याचे ज्यांचे स्वप्न आणि इच्छा असलेल्या बेरोजगारांसाठी अत्यंत महत्त्वाची संधी चालून आली आहे. पंजाब व सिंध बँकेत पात्र उमेदवार अर्ज मागविण्यात येत आहे. या संदर्भात अर्ज कसे करावयचे व भरती प्रक्रिया संदर्भात संपूर्ण माहितीसाठी हा आर्टिकल पूर्ण वाचा.
बँकेत काम करवयाचे अनेकांचे स्वप्न असते. मात्र बँकेत काम करतांनी हा प्रशिक्षण घेणे ही सुवर्ण संधी अत्यंत कमी उमेदवारांना मिळते. पंजाब व सिंध बँकेत अशीच सुवर्ण संधी उपलब्ध झालेली आहे. बँकेने शिकत शिकत काम करणे हा उमेदवारांसाठी भरती प्रक्रिया सुरु केल्याचे पत्रक जाहीर केले आहे.
पंजाब व सिंध बँकेमध्ये अप्रेंटिस या पदांसाठी जागा भरण्यात येणार आहेत. या भरती प्रक्रियेमध्ये तब्बल १०० रिक्त जागा भरण्यात येणार आहे. या साठी रिक्त पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून विहित स्वरूपात अर्ज मागविण्यात येत आहेत. सदर अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची अंतिम दिनांक ३१ ऑक्टोबर २०२४ देण्यात आली आहे.
पदाचे नाव – अप्रेंटिस
पद संख्या – एकूण १०० जागा
वयाची मर्यादा – अप्रेंटिस या पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे वय २० ते २८ वर्षे असावे.
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन स्वरूपात आहे.
पदासाठी अर्ज करण्याची शेवटची दिनांक – ३१ ऑक्टोबर २०२४ अखेर
अधिकृत वेबसाईटसाठी भेट द्या –
punjabandsindbank.co.in
शैक्षणिक अहर्ता –
अप्रेंटिस पदासाठी कोणत्याही शाखेची पदवी प्राप्त उमेदवार अर्ज करू शकतात.
वेतनश्रेणी –
अप्रेंटिस पदासाठी दरमहा ९ हजार रुपये पगार देण्यात येईल.
अर्ज शुल्क
– SC/ST/PWD या उमेदवारांसाठी शंभर रुपये फी भरावी लागेल.
– सामान्य, EWS व OBC या उमेदवारांना दोनशे रुपये फी भरावी लागेल.
महत्वाची कागदपत्रे –
– जन्मतारीख प्रमाणपत्र.
– EWS श्रेणीतील उमेदवारांच्या बाबतीत भारत सरकारने अधिसूचित केल्यानुसार कोणत्याही एका प्राधिकरणाने जारी केलेले उत्पन्न आणि मालमत्ता प्रमाणपत्र.
– वयाची शिथिलता लागू असेल तर तसे पुरावे.
– इयत्ता दहावी आणि बारावीची सर्व प्रमाणपत्रे आणि शैक्षणिक पात्रता असलेली इतर प्रमाणपत्रे.
– जात/श्रेणी/अपंगत्व यासाठीचे प्रमाणपत्र (लागू असल्यास).
– ओबीसी उमेदवारांच्या बाबतीत, नॉन-क्रिमी लेयर क्लॉज असलेले ओबीसी जात प्रमाणपत्र.
– वैध EWS प्रमाणपत्र.
– बेंचमार्क अपंगत्व श्रेणी असलेल्या व्यक्तींच्या बाबतीत जिल्हा वैद्यकीय मंडळाने जारी केलेले अपंगत्व प्रमाणपत्र
– वयाच्या सूटसाठी पात्र असलेल्या व्यक्तींनी जिल्हा दंडाधिकाऱ्यांकडून प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.
– फोटो ओळख पुरावा नाव आणि पत्ता. पोर्टलवरील नोंदणीप्रमाणे दोन पासपोर्ट आकाराचे फोटो.
अर्ज कसा करावा?
सदर भरतीसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. इच्छूक उमेदवारांनी अर्ज https://ibpsonline.ibps.in/psbsep24/ या लिंक वरून करायांचा आहे. अर्जदारांनी अर्ज करण्यापूर्वी त्यांच्याकडे या पदासाठी आवश्यक पात्रता आणि अनुभव असल्याचे सुनिश्चित करावे. उमेदवारांनी अर्ज करताना महत्वाचे कागदपत्रे अपलोड करणे आत्यावश्यक आहे. उमेदवारांनी अर्ज अपूर्ण ठेवल्यास तो विचारात न घेता तो बाद केला जाणार आहे.
अर्ज सादर करण्या संदर्भांतच्या सविस्तर सूचना व माहिती
https://punjabandsindbank.co.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध केलेली आहे. उमेदवारांनी अर्ज करण्याची शेवटची दिनांक ३१ ऑक्टोबर २०२४ आहे. अधिक माहिती घेण्यासाठी https://punjabandsindbank.co.in/system/uploads/recruitment/2150_2024101518143414188.pdf ही PDF जाहिरात बघावी.