अहिल्यानगर जिल्ह्यात असलेल्या 12 विधानसभा मतदारसंघांमध्ये जवळपास सर्वच लढती (Rohit Pawar vs Ram Shinde) या चुरशीच्या होतील अशी सध्या परिस्थिती दिसून येत आहे. या बारा विधानसभा मतदारसंघांमध्ये कर्जत- जामखेड विधानसभा मतदारसंघाची निवडणूक अत्यंत चूरशीची होईल अशी सध्या राजकीय परिस्थिती दिसून येत आहे. या ठिकाणी यावेळेस भूमिपुत्र विरुद्ध उपरा अशी लढत दिसून येत आहे.
आपल्याला माहित आहे की 2019 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये प्रा. राम शिंदे यांच्या विरोधामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कडून रोहित पवार यांनी निवडणूक लढवली होती व यामध्ये त्यांचा विजय झाला होता. तसेच परिस्थिती या वेळेस देखील असून यावेळी मात्र राजकीय पातळीवर अनेक बदल झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये देखील फूट पडलेली आहे व आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून रोहित पवार विरुद्ध भारतीय जनता पार्टी कडून प्रा. राम शिंदे अशीच लढत होत आहे. परंतु या वेळेस मात्र भूमिपुत्राच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहण्याचा निर्धार या मतदारसंघातील जनतेमध्ये दिसून येत आहे. याचाच एक भाग म्हणून जामखेड तालुक्यातील धामणगावचे उपसरपंच, तीन ग्राम पंचायत सदस्य व सहा सोसायटी संचालक यांच्यासह 50 राजकारणातील प्रभावशाली कार्यकर्त्यांनी रोहित पवारांची साथ सोडली व त्या सर्वांनी आमदार प्रा. राम शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवत भाजपमध्ये प्रवेश केल्याची माहिती समोर आलेली आहे. या प्रवेशामुळे नक्कीच प्रा.राम शिंदे यांचे हात बळकट होण्यास मदत होणार असून रोहित पवारांसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
आजोबाच्या संपत्तीवर नातवाचा कायदेशीर हक्क असतो का, आजोबाची संपत्ती नातवाला मिळते ? Rohit Pawar vs Ram Shinde
आठवा वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट! पुढील महिन्यात होणार महत्त्वाची बैठक, बैठकीत कोणता फॉर्मुला निश्चित होणार ? वाचा
यंदाची दिवाळी सर्वसामान्यांसाठी ठरणार खास ! या राज्यात पेट्रोल-डिझेलच्या किमती इतक्या रुपयांनी कमी होणार, सरकारनेचं दिलेत संकेत दिवाळीच्या आधीच महाराष्ट्रातील ‘या’ बड्या बँकांवर आरबीआयची कठोर कारवाई ! ग्राहकांवर काय परिणाम होणार?
याबाबत सविस्तर वृत्त असे की, जामखेड तालुक्यातील धामणगावचे उपसरपंच तसेच तीन ग्रामपंचायती सदस्य व सहा सोसायटी संचालक त्यांच्यासह इतर राजकारणातील अतिशय प्रभावशाली 50 कार्यकर्त्यांनी रोहित पवारांची (Rohit Pawar vs Ram Shinde) साथ सोडून आमदार प्रा. राम शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवला असून भाजपामध्ये प्रवेश केलेला आहे.
या प्रवेशासाठी बाजार समितीचे संचालक सचिन घुमरे यांचा पुढाकार खूप महत्त्वाचा ठरल्याचे बोलले जात आहे. या सगळ्या कार्यकर्त्यांचा पक्ष प्रवेश सोहळा हा आमदार राम शिंदे यांच्या चोंडी येथील निवासस्थानी रविवारी मध्यरात्री पार पडला. या प्रवेशाच्या वेळी भाजप नेते रवींद्र सुरवसे, वैजिनाथ पाटील तसेच सरपंच महारुद्र महारनवर, महालिंग कोरे इत्यादी प्रमुख नेते उपस्थित होते.
कुठल्याही पद्धतीने राजकीय दबाव किंवा पैसा तसेच बळजबरी किंवा कसल्याही आमिषाला बळी न पडता परिसरात जनाधार असलेल्या धामणगाव मधील 50 प्रभावशाली कार्यकर्त्यांनी कर्जत जामखेडचा स्वाभिमान व अभिमानासाठी सुरू असलेल्या भूमिपुत्राच्या लढ्याला बळ देण्याचा हा महत्वपूर्ण निर्णय घेतला असून या सर्व कार्यकर्त्यांनी प्रा.राम शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवत भाजपात जाहीर प्रवेश केला आहे. Rohit Pawar vs Ram Shinde
एक प्रकारे धामणगाव मध्ये झालेला हा एक राजकीय भूकंप असून यामुळे कर्जत जामखेडच्या राजकीय क्षेत्रामध्ये मोठी खळबळ उडाली आहे. यावरून ग्रामपंचायत व सोसायटी पदाधिकारी यांचा पाठिंबा आमदार प्रा. राम शिंदे यांना वाढू लागल्याचे चित्र या माध्यमातून दिसून येत आहे.
यामध्ये धामणगाव चे उपसरपंच गणेश थोरात तसेच सोसायटीचे व्हाईस चेअरमन पप्पाजी थोरात, ग्रामपंचायत सदस्य बाबासाहेब महारनवर, नितीन घुमरे तसेच प्रभाकर महारनवर, ग्रामपंचायत सदस्य बाबासाहेब महारनवर, नितीन घुमरे, प्रभाकर महारनवर, सोसायटीचे माजी चेअरमन बाबुराव घुमरे, सोसायटीचे संचालक सागर गोरे तसेच नानासाहेब महारनवर इत्यादी अनेक मान्यवरांनी आणि प्रभावशाली कार्यकर्त्यांनी राम शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवत भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश केला.