Large Ship hit bridge : बाल्टीमोर शहरामधील फ्रान्सिस स्कॉट पूलास एका जहाजाची धडक बसल्याने पूल रात्री कोसळला. या घटनेमुळे अनेक नागरिक वाहनांसह नदी पात्रात पडले असल्याचे वृत्त हाती आले आहेत. ऐतिहासिक फ्रान्सिस स्कॉट ब्रिज मंगळवारी कोसळला. हा पूल अमेरिकेतील बाल्टीमोर शहरातील पटाप्सको नदीवरील या पूलास एका माल वाहतूक करणाऱ्या जहाजाची जोराची धडक दिल्याने हे पूल पत्त्या सारखे कोसळले तेव्हा त्या पुलावरील अंदाजे ७ जण आणि १२ हून अधिक वाहने नदीत कोसळली. या घटनेमुळे मोठ्या संख्येत जीवित हानी झाल्याची शंका व्यक्त केली जात आहे.
अग्निशमनदलाच्या माहितीच्या आधारे –
येथील अग्निशमनदलाच्या माहितीच्या आधारे एका मोठ्या मालवाहतुक करणारे जहाजाने मंगळवारी रात्री फ्रान्सिस स्कॉट पूलास जोराची धडक दिली असल्याचे त्यानीं सांगितले. विशेष म्हणजे हि घटना घडलेले व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. या घटनेची माहिती मिळताच तातडीने बचाव कार्य आणि मदत देण्यास सुरूवात करण्यात आलेली आहे.
दुसर्या मार्गाने प्रवास –
या मेरीलँडच्या वाहतूक प्राधिकरणाने सर्व वाहन चालकांना अन्य दुसर्या मार्गाने प्रवास करण्याबाबत विनंती केली त्यामुळे वाहतूक नियंत्रणात आणण्यात आली आहे. हि घटना ज्या मार्गावर घडली आणि पूल पडला आहे त्या ठिकाणी जाऊ नये असे हि आवाहन वाहतूक प्राधिकरणाकडून करण्यात आलेली आहे. शहरातील पटाप्सको नदीच्या दोन्ही बाजूचा रहदारीचा रस्ता बंद करण्यात आलेला आहे. त्यामुळे वाहतूक दुसऱ्या मार्गाने वळविण्यात आली आहेत. दरम्यान, घटनास्थळी पोलिसांनी धाव घेत दिलेल्या माहितीच्या आधारे मोठ्या प्रमाणात नागरिक या पटाप्सको नदीत पडले आहेत.
नागरिक नदी पात्रात पडल्याच्या वृत्त –
फ्रान्सिस स्कॉट पूल पूर्ण पणे कोसळल्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहन चालविणारे नागरिक नदी पात्रात पडल्याच्या वृत्ताला बाल्टीमोरच्या अग्निशमनदल यांनी या माहितीला दुजारा दिलेला आहे. घडलेल्या या अपघातामध्ये किती नागरिकांचा मृत्यू झाला हे अद्यापपर्यंत समजलेले नाही. या पटाप्सको नदी वरील हा पुल तीन किलोमीटर लांबीच होता.
महापौर स्कॉट यांच्या माहितीच्याआधारे-
मेरीलँड शहराचे महापौर स्कॉट यांच्या माहितीच्याआधारे घडलेल्या अपघाताच्या ठिकाणी मोठ्या स्वरूपात मदत व बचाव कार्य करण्यास सुरू आहेत. ही घटना मध्यरात्री दीड वाजल्याच्या सुमारास घडली. मालवाहतूक जहाज बाल्टीमोर या ठिकाणावरून जात होते व त्यावेळी हा अपघात घडलेला आहेत. आमचे संपूर्ण लक्ष्य हे मदत व बचाव कार्या देण्यावरच आहेत.
अमेरिकेतील पत्रकार व माध्यम यांनी दिलेल्या माहितीनुसार हा अमेरिकेमधील एक अत्यंत महत्त्वाचा पूल होता. हा फ्रान्सिस स्कॉट पुल फक्त बाल्टीमोर परिसरातील नागरिकांसाठी नाही तर जे नागरिक वॉशिंग्टन व न्यूयॉर्कला जायचे त्यांच्यासाठी हा फ्रान्सिस स्कॉटपूल महत्त्वाचा मानला जात असे. दिवसा या पूलाच्या साह्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक व दळणवळण केली जाते.