मुख्यमंत्री ladki bahin yojna संदर्भात आनंदाची बातमी, पुढील हफ्ता या तारखेला होणार जमा

महाराष्ट्र शासनाने महिलांसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जुलै 2024 या वर्षापासून आमलात आणली होती. यासंदर्भातील महत्वाची माहिती मंत्री अदिती तटकरे यांनी खुलासा केला आहे.

ladki bahin yojna
ladki bahin yojna

 

या योजने संदर्भातील सर्व अंमलबजावणी जुलै 2024 पासून सुरू होवून या अंतर्गत महाराष्ट्र राज्यातील योजनेसाठी पात्र महिलांना दर महिन्याला 1 हजार 500 रुपयांचा थेट हफ्ता त्यांच्या बँक खात्यात जमा होत असल्याचे सर्वांनी या संदर्भात अनुभव आले आहे. यामध्ये ज्या माता भगिणींचा बँक खाता आधारशी सलग्न केलेले आहे. त्या खात्यामध्ये महाराष्ट्र शासनाने माहे जुलै, ऑगस्ट, व सप्टेंबर 2024 या तीन महिन्यांचा हफ्ता अगोदरच पात्र महिलांच्या बँक खात्यात वर्ग झाला आहे.

दरम्यान, महाराष्ट्रात ही निवडणुकीचा बिगुल नुकताच वाजला आहे. आगामी विधानसभे साठी 20 नोव्हेंबरला राज्यात मतदान होईल व माहे 23 नोव्हेंबरमध्ये मतमोजणी होणार. या संदर्भात राजकारणात महाविकास आघाडी व महायुतीमध्ये आरोप प्रत्यारोपान जोर धरला आहे. महाविकास आघाडी व महायुती विधानसभे निवडणुकींसाठी जोराला कामाला लागले आहेत.

या संदर्भात निवडणूक आयोगानेही मतदारांना लुभावण्या व थेट प्रभाव टाकणार्‍या आर्थिक योजना ह्या बंद करण्याच्या सूचनाही राज्य सरकारला देण्यात आलेल्या आहे. यामुळे महाराष्ट्र राज्यातील विविध महत्त्वकांक्षी योजनांना थोडा विराम द्यावे लागले आहे असे समजते.

सध्या सत्तेत असलेले एकनाथ शिंदे सरकारने आताच जाहीर केलेली  लाडकी बहीण योजनेचा देखील काही दिवसांसाठी स्थगित देण्यात आलेली आहे. यामध्ये सरकारने घेतलेला निर्णय असा आहे की, जोपर्यंत निवडणुकांची पुर्ण प्रक्रिया होत नाही तोपर्यंत या योजना स्थगित  किंवा विराम देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

निवडणूक आयोगाने दिलेले आदेश व निवडणुकांसाठी लागू केलेल्याआचारसंहितेचे पालन करण्याच्या हेतूने सत्ताधार्‍यांनी मुख्यमंत्री ladki bahin yojna थोडा काळ स्थगित केल्याचे माहिती समोर आली आहेत. परंतू, सोशल मीडियाच्या माध्यतातून मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनाही बंद झाल्याची चर्चेला उधान आले आहे.

यामुळे या योजनेतील लाभार्थी व नवीन नोंदणी करण्यासाठी तयार महिलांना संभ्रमाचे वातावरण निर्माण झाल्याचे समजते. मात्र सत्य परिस्थिती अशी आहे की, मुख्यमंत्री ladki bahin yojna बंद केलेली नाही. आता याचा पुढील हफ्ता हा केव्हा बँकेत येणार याबाबतची चर्चा सुरू असल्याची माहिती लागली आहे.

यासंदर्भात महिला व बालकल्याणमंत्री आदिती तटकरेंनी या योजने बद्दल माहिती दिली आहे. मुख्यमंत्री माझी ladki bahin yojna सुरूच राहणार असल्याचे त्यांनी स्पष्टीकरण दिलेले आहे. त्यामुळे पात्र महिलांनी या चर्चेला अजिबात लक्ष देवू नका. असे ही त्यांनी यावेळी सांगितले.

त्या पुढे म्हणाल्या की, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची सुरुवात जुलै 2024 पासून सुरू झाली असून या योजनेअंतर्गत राज्यातील पात्र महिलांना दर महिन्याला 1 हजार 500 रुपयांचा हफ्ता हा त्यांच्या आधारशी सलग्न असलेल्या खात्यात जमा केले जाणार आहे. महाराष्ट्र शासनाने माहे जुलै, ऑगस्ट, व सप्टेंबर 2024 या तीन महिन्यांचा लाभ   खात्यात वर्ग केला आहे.

तसेच 4 ऑक्टोबर ते 6 ऑक्टोबर या दरम्यान दोन महिन्यांचा लाभ महाराष्ट्र राज्यातील दोन कोटी 33 लाखांपेक्षा अधिक भगिनींना दिला गेला आहे. या योजनेसाठी पात्र ठरणार्‍या सर्व महिलांना पुढील हा हफ्ता हा डिसेंबर महिन्याचा लाभ त्याच महिन्यात देणार आहे.

या योजने संदर्भातील कोणत्याही चुकीच्या माहिती महाराष्ट्रातील माता भगिनींनी बळी पडू नये असे आवाहन व विनंती मंत्री आदिती तटकरेंनी केले आहे.

Leave a Comment