लखनऊ : भारतीय Cricket संघातील सर्फराझ खानसाठी काही दिवसांपूर्वी एक वाईट बातमी आली होती. त्याच्या भावाचा मोठा अपघातग्रस्त झाला असल्यामुळे संघातील त्याची उणीव भरून काढत सर्फराझ खानने आता क्रिकेटमध्ये इतिहास रचला आहे. जी गोष्ट आतापर्यंत कोणालाही जमली नव्हती ती गोष्ट सर्फराझ खानने आता केली आहे. क्रिकेटमध्ये सचिन तेंडुलकरपासून तर रोहित शर्माला यांना ही जमली नव्हती ती आता सर्फराझ खानने करून दाखवली आहे.
इराणी ट्रॉफी खेळण्यासाठी सर्फराझ खान हा मैदानात उतरला होता. अपघातामुळे त्याचा भाऊ या Cricket सामन्यात खेळू शकला नाही. पण सर्फराझ खानने यावेळी तुफानी फटकेबाजी केली. सर्फराझ खानने सुरुवातीला आतिषबाजी करत शतक झळकावले. यावेळी सर्फराझ खानने जल्लोषात सेलिब्रेशन केले. सर्फराझ खानने यावेळी आपल्या डोक्यावरील हेल्मेट काढले व त्यानंतर दोन्ही हात उंचावत त्याने सर्वांचे अभिवादन स्विकारले. त्यानंतर तो दोन्ही पायांवर बसला व आपल्या ताबीझला दर्शन घेतले. पण सर्फराझ फक्त एवढ्यावर थांबला नाही त्याने त्यानंतर तुफान आतषबाजी करत धडाकेबाज फटकेबाजी सुरु केली व तो आपल्या द्विशतक पूर्ण करण्याच्या दिशेने पुढे खेळत राहिला.
सर्फराझ खानने यावेळी केवळ २५३ चेंडूंत आपले द्विशतक गाठले पूर्ण केले व ते आनंदाने साजरे केले. पण भारताकडून इराणी ट्रॉफीमध्ये सचिन तेंडुलकर या महान क्रिकेटर पासून ते स्टार क्रिकेटर रोहित शर्मा सारख्या बरेच खेळाडू खेळले परंतु आतापर्यंत मुंबईच्या एकही खेळाडूला हा इतिहास रचता आला नाही, ती आज सर्फराझ खानने यावेळी केली आहे. मुंबई संघाकडून एकाही खेळाडूला आजतागत ईराणी ट्रॉफीमध्ये द्विशतक झळकावता आलेले नव्हते. मुंबईक संघाकडून इराणी ट्रॉफीमध्ये द्विशतक झळकावणारा व इतिहास रचणारा सर्फराझ खान हा पहिलाच खेळाडू ठरला आहे. त्यामुळे त्याची कामगिरी हि ऐतिहासिक ठरलेली आहे.
काही दिवसांपूर्वी सर्फराझ खानचा भाऊ मुशीर खानने या इराणी ट्रॉफीसाठीच कारमधून निघाला होता. पण मुशीर खानच्या कारचा अपघात झाला आणि त्याला गंभीर दुखापत झाली. त्यामुळे मुशीर खान जवळपास एक ते दीड वर्षे तरी क्रिकेट सामन्यामधे खेळू शकणार नाही. पण मुशीर खानची उणीव यावेळी सर्फराझ खानने भासू दिली नाही. कारण सर्फराझखानने यावेळी द्विशतक झळकावले आणि मुंबई संघाला ५०० धावांचा डोंगर उभे करून दिला.
सर्फराझने द्विशतक ठोकले आहे. त्यामुळे आता त्याचा भारतीय संघामध्ये समावेश करणार का, हा सर्वात प्रश्न असेल.